Discover बायबल मार्गदर्शिका
Guide 1

आपण देवावर विश्वास ठेवू शकतो

जिम ने एकदा एका नास्तिकांला विचारले की, देव अस्तित्वात असू शकतो हा विचार आजवर कधीतरी थोड्या काळासाठी का होईना तुझ्या मनात आला आहे का.

“हो नक्कीच!” जिमला आश्चर्यचकित करण्याच्या उद्देशाने नास्तिक म्हणाला. “काही वर्षांपूर्वी जेव्हा मला बाळ झालं, तेव्हा देव असू शकतो या विचारावर मी जवळजवळ विश्वास ठेवला होता. जेव्हा मी पाळण्यातील त्या निरागस जीवाला पाहिलं, मी ती लहानशी बोटे हलताना पहिली आणि त्या लहान डोळ्यांंत ओळखीची पहाट पाहिली, तेव्हापासून मी कित्येक महिने त्या प्रभावाखाली होतो आणि स्वत:नास्तिक असल्याचे विसरून गेलो होतो. त्याच लहान बाळाकडे पाहिल्याने मला जवळजवळ विश्वास बसला होता कि देव नक्कीच असला पाहिजे.”